Google search engine
HomeBreaking Newsपिस्तूल विक्रीसाठी आलेल्या राजस्थानच्या युवकाला पोलीसांनी घेतले ताब्यात,

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या राजस्थानच्या युवकाला पोलीसांनी घेतले ताब्यात,

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या राजस्थानच्या युवकाला पोलीसांनी घेतले ताब्यात,
मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी
चार पिस्टलसह २० जिवंत काडतूस हस्तगत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची धडाकेबाज कारवाई धुळे शहरात गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी आलेल्या राजस्थानच्या युवकाला चाळीसगाव रोड पोलिसांनी सापळा रचत शिताफिने अटक केली. त्याच्याकडून चार पिस्टलसह २० जिवंत काडतूस असा एकुण १ लाख २० हजारांचा मुद्यमाल जप्त करण्यात असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मुंबई आग्रा महार्गावरील चाळीसगाव चौफुलीवर एक जण पिस्टल विक्रीच्या उद्देशाने येत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काल मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास सापळा रचून तेथून एकाला पकडले. इकबाल खान वली मोहम्मद (वय १९ रा.मजत, ठाकरखेडा शिला डहाणी, समदडी तहसील, शिवाना जि. बाडमेर, राजस्थान) असे त्याने त्याचे नाव सांगितले. त्याच्याकडून प्रत्येकी २५ हजार रूपये किंमतीच्या एकुण ४ गावठी पिस्टल व २० हजारांच्या २० जिवंत काडतूस असा एकुण १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोना संदीप कढरे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डिवायएसपी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments