Google search engine
HomeBreaking Newsकेळझर धरणाचे शिल्पकार स्व. मोरेंच्या स्मारकसाठी आमदार दिलीप बोरसेंकडून ११ लाखांचा निधी...

केळझर धरणाचे शिल्पकार स्व. मोरेंच्या स्मारकसाठी आमदार दिलीप बोरसेंकडून ११ लाखांचा निधी जाहिर

मुख्य संपादक.प्रविण पवार,क्राईम डायरी 

सटाणा: शहरासह चाळीस गावांची तहान भागविणाऱ्या केळझर धरणाचे शिल्पकार स्व. गोपाळराव मोरे यांचे स्मारक तथा प्रेरणा स्थळ उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच या कामासाठी विकास आरखडा तयार करण्यात येणार आहे. या प्रेरणादायी कामासाठी माझ्या स्थानिक निधी मधून 11 लाख रुपयाचा तातडीचा निधी म्हणून उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केली. आमदार बोरसे म्हणाले की, चौंधाणे येथील स्व.गोपाळराव तानाजी मोरे या एका सामान्य शेतकऱ्याने महाराष्ट्र सरकार व नंतर भारत सरकार दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांना समक्ष भेटून केळझर येथे धरण मंजूर करून घेतले. स्व. मोरे त्याकाळी कुठल्याही पक्षात वा पार्टीचे सदस्य नव्हते. धरण हाच माझा पक्ष असे म्हणून बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील 35 ते 40 गावातील लोकांना बरोबर घेऊन त्यांनी लढा दिला व केंद्र शासनाकडून राज्याला सूचना करून धरण मंजूर करून घेतले. ‘ कुण्या एकाची घरणगाथा ” नावाचे पुस्तक त्यांनी केलेल्या धरण निर्मितीच्या संघर्षमय प्रवास देखील लिहिण्यात आला आहे. त्यामुळे स्व. गोपाळराव मोरे यांच्या संघर्षमय कार्याचा उजाळा देण्यासाठी व येणाऱ्या पिढीला व शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आत्महत्या न करता संघर्ष व संकटातून आपण मोठे काम करू अशी प्रेरणा मिळावी म्हणून गेल्या वर्षी 23 ऑगस्ट गोपाळ सागर धरणाच्या जलपूजन कार्यक्रमाचे औचित्य साधून धरण परिसरात स्व. मोरे यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून स्मारक तथा प्रेरणास्थळ उभारण्याची घोषणा केली असल्याचे आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले. कोरोना सारख्या महामारीच्या संकटाशी तोंड देतांना या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली नाही. आगामी काळात स्व. मोरे यांच्या प्रेरणा स्थळाच्या निर्मितीसाठी तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना सामावून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकरच स्मारक निर्माण समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचेही आमदार बोरसे यांनी नमूद केले. स्मारक उभारण्यासाठी लवकरच विकास आराखडा तयार करण्यात येणार असून येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणाऱ्या कामासाठी माझ्या स्थानिक निधी मधून 11 लाख रुपयांचा तातडीचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार बोरसे यांनी शेवटी घोषित केले. दरम्यान या स्मारकाला भव्य असे स्वरूप देण्यात येणार असून त्यसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या सहकार्याने निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले. केळझर धरणाचे शिल्पकार आमचे वडील गोपाळराव मोरे यांच्या स्मरणार्थ आमदार दिलीप बोरसे यांनी स्मारक उभारण्याची घोषणा करुन 11 लाख निधी जाहीर केल्याने आम्हाला व केळझर कृती समितीला मनस्वी समाधान झाले. हे स्मारक नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणा स्थळ ठरेल. धर्मराज गोपाळराव मोरे, चौंधाणे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments