Google search engine
HomeBreaking Newsसटाणा:तालुक्यातील मुल्हेर ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे

सटाणा:तालुक्यातील मुल्हेर ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे

मुख्य संपादक.प्रविण पवार,क्राईम डायरी

सचिव समितीच्या बैठकीत मुल्हेर ग्रामीण रुग्णालयासाठी 22 कोटीच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली.
बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांसाठी मुल्हेर येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होती.दरम्यानच्या काळात कोरोनाच्या संकटाने तालुक्यात थैमान घातले होते. उपचारअभावी आदिवासी दुर्गम भागातील गरीब रुग्णांची मोठ्याप्रमाणात हेळसांड झाली तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून आरोग्य विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सचिव समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या संदर्भात आज सोमवारी सचिव समितीच्या संपन्न झालेल्या बैठकीत अनुशेषांतर्गत मुल्हेर ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकामाच्या 22.02 कोटीचे प्राथमिक अंदाजपत्रक व आराखड्यास तत्वतः मान्य देण्यात आली आहे. यामुळे प्रलंबित मुल्हेर ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग आता मोकळा झाला असून तांत्रिक बाबींची पूर्तता करून मुल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर ग्रामीण रुग्णालयाची भव्य अशी सर्वसोयीसुविधा असलेली आद्ययवत इमारत तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थाने बांधकामानंतर सुसज्ज रुग्णालय मुल्हेर परिसरातील रुग्णांसाठी खुले होणार असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments