Google search engine
HomeBreaking Newsमालेगाव - कुसुंबा मार्गावरील वाहतूक वळविण्याचे आदेश

मालेगाव – कुसुंबा मार्गावरील वाहतूक वळविण्याचे आदेश

मुख्य संपादक .प्रविण पवार,क्राईम डायरी.

धुळे – मालेगाव- कुसुंबा रस्त्याने धुळे जिल्ह्यात ये- जा करणारी वाहने या रस्त्याने ये- जा न करता धुळे जिल्ह्यातील मोहाडी टोल नाकामार्गे मुंबई- आग्रा महामार्गाने मालेगाव शहराच्या बाहेरून वळविणे. तसेच मालेगाव शहरातून कुसुंबा रस्त्याने धुळे जिल्ह्याकडे जाणारी अवजड वाहतूक मनमाड चौफुली मार्गे मुंबई- आग्रा महामार्गाने मालेगाव शहराच्या बाहेरून मोहाडी टोल नाका मार्गे वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे, नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांनी – सटाणा- ताहराबाद- साक्री- धुळे या मार्गावर – दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मालेगाव- कुसुंबा रस्त्याने धुळे जिल्ह्यात ये- जा करणारी वाहने या रस्त्याने ये- जा न करता धुळे जिल्ह्यातून मोहाडी टोल नाका मार्गे मुंबई- आग्रा रस्त्याने मालेगाव शहराच्या बाहेरून वळविणे आणि मालेगाव शहरातून कुसुंबा रस्त्याने धुळे जिल्ह्याकडे जाणारी अवजड वाहतूक ही मनमाड चौफुली मार्गे मुंबई- आग्रा रस्त्याने मालेगाव शहराच्या बाहेरून मोहाडी टोल नाका, जि. धुळे मार्गे वळविण्यासाठी विनंती केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या कलमानुसार प्राप्त अधिकारांन्वये कायदा आणि सुव्यवस्थेची बाब विचारात घेवून जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी वरील आदेश दिले आहेत. सदरचा प्रतिबंधात्मक आदेश धुळे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रासाठी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईपर्यंत अंमलात राहील. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे व पोलिस विभागाने कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments