Google search engine
HomeBreaking Newsपोलीस अधिक्षकांच्या खबरीवरून अप्पर अधिक्षक पथकाच्या कारवाईत अठ्ठावीस लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त

पोलीस अधिक्षकांच्या खबरीवरून अप्पर अधिक्षक पथकाच्या कारवाईत अठ्ठावीस लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त

मुख्य संपादक.प्रविण पवार,क्राईम डायरी
मालेगाव पोलीस अधिक्षकांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून अति.पो.अधिक्षकांच्या विशेषा पथकाने केलेल्या धडक कारवाईत सात लाखाच्या वाहनासह तब्बल अठ्ठावीस लाखाचा प्रतिबंधीत गुटख्याचा मुद्देमाल ग्रामिण पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.जायखेडा परिसरात नामपूर ताहराबाद रोडवर
रविवार दि.०३/१०/२०२१ रोजी ०६.०० वा. सुमारास ताहराबाद ते नामपुर मार्गावरील जायखेडा बस थांबा परिसरात MH ४१ AU १७१५ या आयशरमधून प्रतिबंधीत गुटखा वाहून नेला जाणार असल्याची माहीती बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर पो.अधि.सचिन पाटील यांनी मालेगावचे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी विशेष पथक नाकाबंदीसाठी पाठवले.या पथकाने संंबधीत वाहन थांबवुन चालकाची विचारपूस केली. किशोर वसंत ठाकरे, वय २५, रा. बिजोरसे, इजमाने रोड, मळगांव फाटा, मालेगांव असे नाव सांगितले, त्याचे ताब्यात असलेले वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये लाखोंचा गुटखा सापडला. महाराष्ट्र शासनाने विक्रास प्रतिबंध केलेला पानमसाला (गुटखा) व सुगंधीत तंबाख अवैध रित्या विक्री करण्याचे उद्येशाने या मालाची वाहतूक सुरू होती. सुगंधीत पानमसाला व सगंधीत तंबाख याबाबत विचारपुस करता त्याने कोणत्याही खरेदी विक्रीच्या पावत्या अगर वाहतक परवाना सादर केला नाही. तसेच सदर प्रतिबंधात गुटखा व सुगंधीत तंबाखुचे मुळ मालकाबाबत विचारपस करता त्याचे सांगणे की, सदरचा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखु ही नामपूर येथील इसम महेंद्र वसत अहिरे (पांडकर), रा. बाजारपेठ, नामपुर याचे मालकिचा असुन त्याच्या सांगण्यावरून सदरचा माल हा गुजरात राज्यातुन नामपुर गावामध्ये विक्री करण्याचे उद्येशाने घेवन जात आहे.या कारवाईत ११,६६,८८०.०० विमल पान मसाल्याचे (२२ पाऊच वाले) एकण ३० खाकी रंगाचे सुती पोते,
प्रत्येक पोत्यात ०४ छोटया प्लॅस्टिकच्या पांढऱ्या रंगाच्या गोण्या असलेल्या. प्रत्येक गोणीमध्ये ५२ प्लॅस्टिकचे विमल पान मसाल्याचे १५४ ग्रॅमचे पुडे
असलेले प्रति पुडयाची किंमत रु. १८७ प्रमाणे असलेले. २) २,०५,९२०.०० व्हि – १ तंबाखु (२२ पाऊच वाले) चे एकुण ६ पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिकचे
पोते, त्यात प्रत्येक पोत्यामध्ये ५ पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोण्या, प्रत्येक गोणीत ०४ छोटया प्लॅस्टिकच्या निळया रंगाच्या गोण्या असलेल्या, प्रत्येक गोणीमध्ये ५२ प्लॅस्टिकचे व्हि – १ तंबाखुचे प्लॅस्टिकचे पुडे असलेले प्रत्येक
पुडयाची किंमत रु. ३३ प्रमाणे असलेले… ३) ६,५३,४००.०० विमल पान मसाल्याचे (११ पाऊच वाले) चे एकुण १५ खाकी रंगाचे सती
पोते. प्रत्येक पोत्यात १० छोटया प्लॅस्टिकच्या पांढऱ्या रंगाच्या गोण्या असलेले, प्रत्येक गोणीमध्ये २२ प्लॅस्टिकचे विमल पान मसाल्याचे १५४
ग्रॅमचे पुडे असलेले प्रति पुडयाची किंमत रु. १९८ प्रमाणे असलेले… ४) ७२,६००.०० व्हि – १ तंबाखु (११ पाऊच वाले) चे एकुण १५ निळया रंगाच्या प्लॅस्टिकच्या
गोण्या. प्रत्येक गोणीत १० छोटया प्लॅस्टिकच्या निळ्या रंगाच्या गोण्या असलेले. प्रत्येक गोणीमध्ये २२ प्लॅस्टिकचे व्हि.१ तंबाखचे प्लॅस्टिकचे पडे
असलेले, प्रति पुडयाची किंमत रु. २२ प्रमाणे असलेले. ५)७,००,०००.००
रु. किंमतीची EICHER कंपनीची Pro १०४९ मॉडेलची खाकी रंगाची . MH ४१ AU १७१५ क्रमाकांची आयशर गाडी असा एकूण २७,९८,८०० एव्हढा मुद्देमाल जप्त केला आहे. पो.अधि.सचिन पाटील यांच्या सुचनेवरून अप्पर पो.अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पाठवलेल्या पीएसआय आर.के.घुगे,पो.हवा.महाले.भुषण खैरनार,संदीप राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments