Google search engine
HomeBreaking Newsजळगाव येथील जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक चार हजाराची लाच घेतांना ए...

जळगाव येथील जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक चार हजाराची लाच घेतांना ए सिबिने केली अटक रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

जळगाव येथील जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीकास जळगाव एसीबीने सदनिका खरेदी प्रकरणी ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच मागणी करणाऱ्या जळगाव जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीकास जळगाव एसीबीच्या पथकाने सापळा रचून आज दिनांक 20/10/2021रोजी रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली यामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील निमखेडी शिवारातील एका सदनिका संस्थेमधील सदनिका खरेदी करणार असल्याने खरेदी करण्यासाठी तक्रारदार यांना जळगाव उपनिबंधक कार्यालयाकडन नाहरकत दाखला लागत असल्याने त्यांनी जळगाव जिल्हा निबंधक कार्यालयाकडे नाहरकत दाखला देण्यासाठी कनिष्ठ लिपिक विनोद रमेश सोनवणे वय 46 रा. रिधुर वाडा शनिपेठ जळगाव यांनी तक्रारदारास पाच हजाराची मागणी केली होती यात तडजोड करून चार हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदार यांनी विनोद सोनवणे ला चार हजार रुपये लाच देण्याची तक्रार एसिबिकडे केल्याने विनोद सोनवणे ला लाचलुचपत विभागाने चार हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली लाचखोर विनोद सोनवणे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments