Google search engine
HomeBreaking Newsग्रामपंचायत देवारपाडे येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

ग्रामपंचायत देवारपाडे येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी
मालेगाव विधी सेवा सामिती व मालेगांव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा.शा.भा.बहाळकर जिल्हा न्यायाधीश १ यांचे मार्गदर्शनानुसार पॕन इंडिया अवेरनेस या उपक्रमांतर्गत महिला अत्याचार व कायदेविषक सर्वसामान्य जनजागृती व मार्गदर्शन मिळावे यासाठी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे मा.श्री, अनिरुद्ध गांधी साहेब जिल्हा व अप्पर न्यायाधीश -2, मा. श्री. एस. आर.निमसे साहेब सह दिवाणी न्यायाधीश, मालेगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील तर सचिव निलेश पाटील,अँड.जितेंद्र शेळके उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात कायदेविषयक माहिती ग्रामस्थांना महिलांना, व सामान्य जनतेला ज्ञात असल्यास न्याय मिळण्याची प्रक्रिया सुखकर होते व न्याय जरूर मिळतो.ग्रामीण भागात पोहचवण्यासाठी कार्यक्रम आयोजन करण्यात आले मार्गदर्शन करताना महिला विषयीच्या सुरक्षेवर,रस्ते वाहतूक अधिनियान्वये, कौटुंबीक, भावबंधलकितला वाद यावर आधारित विषयक माहितीपर सांगण्यात आले तसेच या प्रसंगी कार्यक्रमात विधी सेवा समिती कार्यालय मार्फत तक्रार निवारण, कायदे आपल्याचसाठि बनले आहेत त्यांचे पालन जनतेने करावे असे आवाहन मा.श्री.अनिरुद्ध गांधी साहेब जिल्हा न्यायाधीश यांनी या प्रसंगी केले. या कार्यक्रमात तालुका विधी सेवा समितीचे फलक मान्य वराच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वकील संघाचे अॕड.निलेश पाटील यांनी प्रास्ताविक सांगत कार्यक्रम सुरूवात केले. मालेगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी कायदे विषयक सेवा,यावर जागरूकता करत, विधी सेवा समितीचे जागरूकता, आवश्यकता, यावर यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रामसेवक श्री.द्यानद्यान यांनी केले. श्री.दिलिप गुप्ता कनिष्ठ लिपिक मालेगाव कोर्ट,पि.एल.वी.श्री.योगेश नेमनार यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन नियोजन केले.
श्री.भाऊसाहेब पिजंन ग्रामपंचायत सरपंच यांनी आलेल्या प्रमुख पाहुणे, वक्ते यांचे आभार मानले तसेच नथु काळे,केशवनाना सूर्यवंशी,विठोबा घुमरे,डॉ. रविंद्र सूर्यवंशी व , ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी,आदि या कार्यक्रमास उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments