Google search engine
HomeBreaking Newsएसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करा अन्यथा तीव्र आंदोलन करु भाजप तालुकाध्यक्ष निलेश...

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करा अन्यथा तीव्र आंदोलन करु भाजप तालुकाध्यक्ष निलेश कचवे व प्रदेश सदस्य लकी आबा गिल यांचा आघाडी सरकारला इशारा

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन १८ हजार मिळावे आणि दरमहा अखंडितपणे वेतन मिळावे, यासाठी १ लाख कर्मचारी आज संपावर गेले आहेत, एसटीच्या २४८ आगारातील सर्व कर्मचारी आज संपावर आहेत. यामुळे राज्य परिवहन महामंडळात दिवाळी सणाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट उभे ठाकले आहे, ‘राज्यघटनेच्या कलम १२ नुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे राज्य सरकारच्या मालकीचे महामंडळ असल्याने येथे काम करणारे सरकारी कर्मचारी आहेत. अनेक वर्षांपासून एसटी कर्मचारी अन्याय सहन करत आहे. प्रशासनाने ३१ ऑक्टोबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय वेतन देण्याचा शासन निर्णय जाहीर करावा, अन्यथा राज्यातील १ लाख कर्मचारी ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन करतील, याची नोंद राज्य शासनाने घ्यावी. तसेच जो पर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत भारतीय जनता पार्टी या आंदोलनात सक्रिय राहील,असे जाहीर आव्हाहन भाजपचे अध्यक्ष निलेश कचवे व प्रदेश सदस्य लकी आबा गिल यांनी दिला,तसेच या काळात प्रवाशांच्या गैरसोयीला महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल’, या वेळी दूरध्वनीवरून राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून ,संपूर्ण महाराष्ट्र भर बंद ला आमचा पाठिंबा आहे व राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यास भाग पाडू,व कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल या आशयाचे आश्वासन दिले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments