Google search engine
HomeBreaking Newsमालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातील मतदारांनी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत त्वरीत अर्ज सादर करावेत:मतदार...

मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातील मतदारांनी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत त्वरीत अर्ज सादर करावेत:मतदार नोंदणी अधिकारी गणेश मिसाळ

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

*मालेगाव दिनांक: 31 ऑक्टोबर 2021
भारत निवडणूक आयोगाकडून राज्यात सर्वत्र छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने महिला व पुरूष नव मतदार नोंदणी करणे, मतदारांचा मतदार यादीतील तपशील दुरूस्त करणे, मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांचे नाव वगळणे तसेच मतदार संघांतर्गत मतदारांचे नाव स्थलांतरीत करणे याकरिता अर्जदार किंवा मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे नमुना अर्ज भरून सादर करावे, असे आवाहन मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाचे, मतदार नोंदणी अधिकारी गणेश मिसाळ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी 1 नोव्हेंबर 2021 रोजी होणार असून दावे व हरकतींवर कार्यवाही करण्याचा कालावधी 20 डिसेंबर 2021 पर्यंत असणार आहे. त्याअनुषंगाने मतदारांना यादीतील दुरूस्ती किंवा बदल करण्याकरिता शनिवार 13, रविवार 14 व शनिवार 27 व रविवार 28 नोव्हेंबर 2021 या रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयास राजकीय पक्षांकडून प्राप्त दुबार मतदार याद्या www.nashikmitra.in या संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्यात आल्या आहेत. मतदार सदर संकेतस्थळावर जाऊन आपल्या दुबार नावाबाबत खात्री करू शकतात.

संकेतस्थळावरील नमूद दुबार मतदारांच्या याद्यांमधील मतदारांची पडताळणी करण्याचे काम 115- मालेगाव बाह्य मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत सुरू असून आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने 115 मालेगाव बाह्य विधानसभा मतदान संघातील ज्या मतदारांची नांवे इतर मतदार संघात अथवा 115 मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाअंतर्गत दुबार समाविष्ट असतील अशा मतदारांनी स्वत:हून पुढाकार घेऊन प्रचलित नियमांप्रमाणे नमुना फॉर्म क्र 7 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या संपर्क करून भरून घ्यावेत. असेही मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाचे, मतदार नोंदणी अधिकारी गणेश मिसाळ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments