Google search engine
HomeBreaking Newsमालेगांव येथील बस स्थानकात थांबलेल्या बदलापूर -चोपडा बसमधुन लॅपटाॅप महागडे मोबाईल सह...

मालेगांव येथील बस स्थानकात थांबलेल्या बदलापूर -चोपडा बसमधुन लॅपटाॅप महागडे मोबाईल सह बॅग लंपास

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

मालेगाव

बदलापूर-चोपडा बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची बॅग लांबवित त्यातील महागडे लॅपटॉप व मोबाईल लंपास करणाऱ्या भामट्याविरुद्ध आयेशानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येथील नवीन बसस्थानकात घडलेल्या या प्रकाराने प्रवाशी वर्गात घबराट पसरली आहे. याप्रकरणी मनोज आनंद वानखेडकर (४८) रा. देवपूर धुळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते बदलापूर-चोपडा या बसमधून प्रवास ते करीत होते. मालेगाव बसस्थानकावर बस थांबल्यानंतर ते लघुशंकेसाठी खाली उतरले ही संधी साधून अज्ञात भामट्याने त्यांच्या जागेवर ठेवलेली बॅग लंपास केली. याबॅगेत दोन लॅपटॉप, दोन ब्लॅकबेरी मोबाईल फोन, महत्वाची कागदपत्रे होती. मनोज वानखेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आयेशानगर पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जमादार कदम तपास करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments