Google search engine
HomeBreaking Newsभाऊबीजेला मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर निर्घुणपणे तरुणाची हत्या

भाऊबीजेला मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर निर्घुणपणे तरुणाची हत्या

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

नाशिक – चांदवड तालुक्यातील उसवाड येथील तरुणाची चाकूने भोसकून चार तरुणांनी हत्या केल्याची घटना आज मनमाड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चार रेल्वेस्थानकावर घडली आहे शिवम संजय पवार वय २१ उसवाड तालुका चांदवडअसे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे प्रेयसीच्या मित्राचे फेक आयडी तयार करून अश्लील फोटो सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाउंट वर व्हायरल केल्याच्या रागातून हत्या झाल्याचे बोलले जात आहे भाऊबीजेच्या दिवशी झालेल्या हत्यामुळे संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शिवम ला तीन बहिणी आहे या घटनेनंतर शिवम पवार ची प्रियसी मनीषा संजय साळवे वय – २० राहणार उल्हासनगर हिने मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे की शिवम चे आणि माझे अडीच वर्षापासून प्रेम संबंध आहे त्यामुळे मी माझ्या कामावरील मोहित, भोईर,

निश, चेतन मोदडे यांच्यासोबत असल्याने त्यांच्याशी मोबाईल फोनवर बोलणे होत अ शिवम पवार यांच्या वागण्या वरून शिवम ने मोहित चेतन यांना माझ्याशी बोलण्यास मनाई करून त्यांची इंस्टाग्राम वर फेक आयडी करून अश्लील फोटो टाकल्याचा त्यांना राग आला त्यांनी शिवमला झालेला गैरसमज दूर करायचा असे सांगून मला मनमाड येथे घेऊन आले व तिथे शिवम सोबत झालेल्या भांडणाचा व त्यांनी टाकलेले इंस्टाग्राम वरील टाकलेल्या बदनामीकारक फोटो याचा राग आल्याने शिवम चा खून केला फॉर्म नंबर -४ वर नंदिग्राम एक्सप्रेस ही गाडी उभी असताना माझ्या समोर मोहित. चेतन निश. मयूर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर मयूर ने चाकूने वार करून त्याचा खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments