Google search engine
HomeBreaking Newsराष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर भालगाव फाट्यावर चाकूचा धाक दाखवून सीआरपीएफ जवानाला लुटले

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर भालगाव फाट्यावर चाकूचा धाक दाखवून सीआरपीएफ जवानाला लुटले

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

एरंडोल : सीआरपीएफ जवानाला चाकूचा धाक | दाखवून मारहाण करीत रस्ता लुटीची घटना १९ नोव्हेंबर २० २१ रोजी गुरुवारी मध्यरात्री घडली साडेतीन हजार रुपये रोकड मोबाईल व बॅग इत्यादी ऐवज घेऊन आरोपीनी पोबारा केला दरम्यान एरंडोल पोलिसांनी सीआरपीएफ जवान माळी हे जळगाव येथून तवेरा गाडीत बसले त्या ठिकाणापासून रस्ता लुटीच्या घटनेपर्यंत ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासले आहेत त्यातून आरोपी निष्पन्न होणार का याकडे लक्ष लागले आहे.

सावित्री नगर पारोळा येथील मूळ रहिवासी असलेले श्रीकांत शांताराम माळी हे सीआरपीएफ मध्ये जवान म्हणून कार्यरत आहेत ते रजा घेऊन घरी पारोळा याकडे तवेरा गाडी ने परत जात असताना रात्री सव्वा वाजता गाडी चालक व दोन अज्ञात इसमांनी या जवानांची चाकूचा धाक दाखवून लूट केली व त्यांनी पळ काढला विशेष हे की त्यांच्या बागेत एटीएम कार्ड, | युनिफॉर्म, व काही महत्त्वाची कागदपत्रे होती या प्रकरणी एरंडोल पोलीस | स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे कसून तपास करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments