Google search engine
HomeBreaking Newsउल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पो.नि. अभिषेक पाटील यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते...

उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पो.नि. अभिषेक पाटील यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते गौरव

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

धुळे – भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते राजभवन, मुंबई येथे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना ‘Navbharat Goo d ood Governance -ward-2021’ प्रदान करण्यात येवून गौरव करण्यात आला.

पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत आहेत. ते धुळे जिल्ह्यात कार्यरत असतांना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचे सीमेलगत दुर्गम भागात अमली पदार्थांचे उत्पादन व तस्करीचा नायनाट करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत केवळ कारवाईच नव्हे तर जनतेमध्ये प्रखरपणे जनजागृती करण्यात आली. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून आला.  तसेेेच नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत गोंदिया, गडचिरोली व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत दुर्गम भागांमध्ये नक्षलविरोधी जनजागृती करत विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षांचे वर्ग चालवून अनेक विद्यार्थ्यांना पोलीस व शासकीय विभागात संधी उपलब्ध करून दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments