Google search engine
HomeBreaking Newsमोहाडी पोलीस स्टेशनचे पीआय शिंदे यांचा धिरज गवते, जितेंद्र वाघ व अन्य...

मोहाडी पोलीस स्टेशनचे पीआय शिंदे यांचा धिरज गवते, जितेंद्र वाघ व अन्य दोन कर्मचाऱ्यांवर वचक नाही का ? गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली या प्रकरणाची दखल

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

मोहाडी (धुळे) पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मोहाडी उपनगरात राहणाऱ्या निलेश बबन भारती (गोसावी) यास अमानुष मारहाण केल्याची घटना दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. निलेश भारती हा हमाली व क्लिनरचे काम करतो. दि. २६ रोजी तो चाळीसगाव चौफुलीकडून उड्डाणपुलावरुन जात असताना त्यास पोलिसांनी अडवून दमबाजी केली व पोलिस ठाण्यात नेवून अमानुष मारहाण केली. इतकेच नव्हेतर ड्रिंक अॅण्ड डाईव्हचा खोटा गुन्हाही दाखल केला. याप्रकरणी निलेश भारती याने गृहमंत्र्यांसह नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांना तक्रारीचे निवेदन दिले असून संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

निलेश भारती याने तक्रारीत म्हटले आहे की, दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजेदरम्यान काम आटोपून मी माझ्या मित्राच्या मोटारसायकलने चाळीसगाव चौफुलीकडून उड्डाणपुलावरुन जात असताना माझी मोटारसायकल अचानक बंद पडली. ती बाजूला घेऊन किक मारुन सुरु करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळेस दोन मोटारसायकलने मोहाडी पोलिस ठाण्याचे तीन पोलिस आले. त्यांनी ‘हरामखोर त इथे काय तु करतो आहेस’ असे म्हणत दमबाजी केली व कानशिलात लगावली. त्यानंतर मला मोटारसायकलवर बसवून पोलिस ठाण्यात नेले. त्यांना नाव विचारले असता त्यांनी धिरज गवते, जितेंद्र वाघ असे सांगितले. तसेच पोलिस ठाण्याच्या शेवटच्या खोलीत नेवून कपडे काढायला लावले. त्यानंतर काठीने व हाताबुक्क्यांनी तळपायावर, हातावर, पाठीवर व मांडीवर भयंकर मारले. विनवण्या करुनही कोणालाच दया आली नाही. मारहाण केल्यानंतर संगणकावर एक कागद टाईप करुन त्यावर माझी सही घेतली. त्यानंतर रात्री ११.३० वाजता मला सोडून दिले व ‘कोर्टात दंड भरुन तुझी गाडी सोडवून घे’ असे सांगितले. कोणतीही चुक नसताना पोलिस ठाण्यात नेवून अमानुष मारहाण केली व पाच तास बसवून ठेवले. तसेच ड्रिंक अॅण्ड ड्राईव्हची खोटी केस केली. मारहाणीचे वळ शरिरावर अजुनही असून धड चालताही येत नाही. मी खरेच गुन्हा केला तर मला दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केले असते. मात्र, कोर्टात न नेता मोटारसायकल सोडून दिली. त्यामुळे विनाकारण अमानुष मारहाण करुन खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी धिरज गवते, जितेंद्र वाघ व अन्य दोन पोलिस कर्मचारी (नावे माहित नाही) यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांना निलंबित करावे, अशी मागणी निलेश भारती याने केली आहे. दरम्यान, यासंदर्भात निलेशने जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांचीही भेट घेत तक्रार केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments