Google search engine
HomeBreaking Newsनिजामपूर जैताणे येथील मेंढपाळ परिवारातील सुपुत्र नारायण न्याहळदे यांची नाशिक लाचलुचपत विभागात...

निजामपूर जैताणे येथील मेंढपाळ परिवारातील सुपुत्र नारायण न्याहळदे यांची नाशिक लाचलुचपत विभागात अप्पर पोलीस अधिक्षक पदी बढती

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

साक्री तालुक्यातील जैताणे येथील मेंढपाळ परिवारातील सुपुत्र व सध्या शिर्डी येथे पोलीस निरीक्षक पदावर असलेले नारायण सखाराम न्याहळदे यांची नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधिक्षक (ॲडीशनल एस.पी.) पदावर बढती होऊन नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जैताणे येथील शेळी-मेंढी पालक, प्रगतीशिल शेतकरी, विठ्ठल मंदीर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. स्वर्गिय सखाराम हिराजी न्याहळदे उर्फ सखाराम महाराज यांचे ते सुपुत्र आहेत. नारायण सखाराम न्याहळदे यांची पी. एस. आय. म्हणून प्रथम नियुक्ती नागपूर येथे झाली होती, त्यानंतर जालना, बुलढाणा, नंदूरबार, नवी मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यात फौजदार ते पोलीस निरीक्षक या पदापर्यंत त्यांनी समर्थपणे कामगिरी बजावली. नियुक्तीच्या सर्वच ा ठिकाणी धार्मिक, जातीय सलोखा कायम रहावा यासाठी शर्थीचे र प्रयत्न करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर गुन्हेगारांना न गजाआड पाठविण्याचीही कामगिरी चोखपणे बजावली. आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल डिपार्टमेंट मध्ये सेवेतील विविध पदकाचे ते मानकरी ठरले आहेत. निजामपूर जैताणे परिसरात अॅडीशनल एस. पी. पदापर्यंत पोहोचणारे ते एकमेव प्रथम व्यक्ती आहेत.

विरदेल येथील ज्येष्ठ समाजसेवक व दोंडाईचा कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती साहेबराव नाना पेंढारकर यांचे ते जावाई असून धुळे पोलीस दलातील ए. एस. आय. युवराज रामदास सूर्यवंशी यांचे साडू आहेत. उच्च पदावर पोहोचूनही त्यांचे  जैताणे येथील ज्येष्ठ बंधू राजाराम – आबा न्याहळदे व संपूर्ण न्याहळदे  परिवाराने आजही शेळी-मेंढी पालन व शेती संस्कृतीशी आपली नाळ कायम ठेवून परिसरात न्याहळदे परिवार धार्मिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments