Google search engine
HomeBreaking Newsसाक्रीरोड, भाईजी नगरसह अवधान येथील ३ तरुणी बेपत्ता

साक्रीरोड, भाईजी नगरसह अवधान येथील ३ तरुणी बेपत्ता

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

धुळे शहरातील साक्री रोडवरील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. याबाबत शहर पोलिसात वडीलांनी तक्रार दिली आहे. १४ रोजी सकाळी ७ वाजेला घरातील लोक उठले तेव्हा मुलगी घरात दिसली नाही, घराचा दरवाजा सुध्दा बाहेरुन बंद होता. वडीलांनी आजुबाजुच्या लोकांना |आवाज देवून दरवाजा उघडण्यास लावला आणि मुलीचा शोध घेतला. |मात्र मुलगी कुठेही सापडली नाही. त्यामुळे ती १८ वर्षीय तरुणी घरात |कोणाला काही न सांगता निघुन गेल्याची तक्रार शहर पोलिसात नोंदवली आहे. तसेच शहरातील भाईजी नगर येथून २० वर्षीय तरुणी दि. १४ रोजी दुपारी बेपत्ता झाली. त्या तरुणीने १२.३० वाजेला आईला सांगितले की, साईबाबा मंदिरात जावून येते, मात्र दुपारी २ वाजले तरी मुलगी घरी परत न आल्याने तिच्या वडीलांना फोन करून माहिती दिली. तिच्या जवळ असलेला फोन सुध्दा ती मुलगी उचलत नव्हती, त्यामुळे आजुबाजुला आणि नातेवाईकांकडे तपास करून अखेर शहर पोलिसांत जावून मुलगी | हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. तर तिसरी घटना शहरातील अवधान भागात घडली असून अवधान येथील १९ वर्षीय तरुणी दि. १३ रोजी दुपारी ३ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान घरात कोणाला काही न सांगता कोठेतरी निघून गेली आहे. तिच्या वडीलांनी मोहाडी पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments