Google search engine
HomeBreaking Newsशिरपूर शहर पोलीस ठाणे येथील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त...

शिरपूर शहर पोलीस ठाणे येथील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणगौरव

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

धुळे- शिरपूर शहर पोलीस – ठाणे येथे उत्कृष्ट पोलीस अंमलदार यांच्या गुणगौरव कार्यक्रम दि २६ जानेवारी रोजी संपन्न झाला पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांचे संकल्पनेतून व अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांचे मार्गदर्शनातून शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथील पोलीसांचे कामाचा दर्जा उंचाविण्यासाठी दर महिन्यातील उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस अंमलदार यांचा गुणगौरव व उत्कृष्ट कामगीरी करण्यास प्रोत्साहन देणा-या संकल्पनेतून शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी २६ जानेवारी २०२२ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांचे प्रमुख उपस्थित ज्या पोलिस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी प्रलंबित गुन्ह्याची तात्काळ निर्गती करणे, मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणे, फरार व पाहिजे असलेले आरोपी पकडणे तसेच दोषसिध्दीसाठी कृशल तपास करून उत्कृष्ट कामगीरी अशी सोपविलेली जबाबदारी अतिशय प्रमाणिकपणे व श्रमाने उत्कृष्ट पार पाडले अशांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रथम पारितोषिक पोहेकॉ नारायण मालचे यांना देवून त्यांचा गौरव करण्यात आला.नवल कढरे तसेच पोलीस ठाण्यातील विशेष कामगिरी करणारे पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, असई नारायण पाटील, रामकृष्ण मोरे, पोहेकों लादुराम चौधरी, ललित पाटील, पोना तुकाराम गवळी, भरत चव्हाण, हेमंत पाटील, पोकों गोविंद कोळी, विनोद आखडमल, प्रविण गोसावि, मनोज दाभाई, अनिल अहिरे व मपोकां स्वाती शहा अशांना बक्षीस देवून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे वेळी पोलीस अंमलदार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून त्यात त्यांनी गुणांना वाव मिळून त्यांचेतील प्रतिभा व सुप्त गुण जागृत करणारा व भविष्यात चांगली कामगिरी करून बक्षिस मिळविण्याचा संकल्प केला आहे त्याबद्दल धुळे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे मनापासून आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments