Google search engine
HomeBreaking Newsतीस हजाराची लाच स्वीकारताना जळगावांतील शिपाई जाळ्यात

तीस हजाराची लाच स्वीकारताना जळगावांतील शिपाई जाळ्यात

मुख्य संपादक प्रविण पवार क्राईम डायरी

जळगाव- सुशिक्षित बेरोजगार तरुणाला माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीसाठी २ लाख १० हजारांची लाच मागून पहिला हप्ता ३० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या जळगाव पथकाशे साहाय्यक कामगार आयुक्त येथील शिपाईला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. जळगाव मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असुन त्यांनी मा. जळगाव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळणेबाबत अर्ज सादर केला होता. सदर कंत्राटी सिक्युरीटी गार्डची नोकरी लावून ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे साहाय्यक कामगार आयुक्त येथील शिपाई गोपाळ कडू चौधरी, वय – ५५, रा. जुना खेडी रोड, जळगाव यांनी पंचासमक्ष प्रथम २ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. आज दि ११ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जळगाव परीससरात लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. सदर लाचेच्या रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून ३० हजारांची लाच स्विकारतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने शिपाई गोपाळ चौधरी याला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई तपास अधिकारी – शशिकांत श्रीराम पाटील, पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव तसेच सापळा व मदत पथक- उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत एस. पाटील, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना. जनार्धन चौधरी, पो. ना. सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ. ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments